भरधाव कारने दुचाकीस उडविले

0

जळगाव । एका कारने सिल्लोडकडून जळगावकडे येत असलेल्या तरूणांच्या दुचाकीला उडविल्याची घटना गुरूवारी दुपारी उमाळा-चिंचोली गावाजवळ घडली. जखमी झालेल्या दोन्ही तरूणांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून दोघांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. प्रत्यक्षदर्क्षींनी दिलेली माहिती अशी की, बापु एकनाथ सपकाळ (रा. पिशोर) व दिपक विक्रम धनवई (रा. वुडन) हे दोघे तरूण सिल्लोड येथून दुपारी जळगावासाठी दुचाकीवरून रवाना झाले होते. बापु हा दुचाकी चालवत होता. सायंकाळी अचानक समोरून एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. यात दोन्ही तरूण दुरवर फेकले गेलेत. यावेळी जवळच असलेल्या नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत जखमींना रूग्णवाहिका बोलवून जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. सायंकाळी जिल्हा रूग्णालयात बापु आणि दिपक यांना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून बापु यास पायाला गंभीर इजा झाली आहे.