भरधाव गाडीने पादचार्‍याला उडवले

0

पादचा-याचा उपचारादरम्यान मृत्यू

निगडी : रस्त्याने जात असलेल्या एका पादचार्‍याला भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराने उडवले. गंभीर जखमी झालेल्या पादचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना संभाजी नगर मंगळवारी घडली. दुचाकीस्वाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. इंदर बळीराम कवडे (वय 55, रा. श्रीराम सोसायटी, म्हेत्रे वस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या पादचार्‍याचे नाव आहे. याबाबत राजू भोर (वय 50, रा. आदिनाथ नगर, भोसरी) यांनी दिनेश कुलकर्णी (रा. मोरेवस्ती, चिखली) या दुचाकीस्वाराच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राजू भोर व इंदर कवडे मंगळवारी सकाळी भोसरीमधून पायी जात होते. अचानक दिनेश कुलकर्णी हा दुचाकीवरून भरधाव वेगात आला. दुचाकीने इंदर कवडे यांना जबर ठोकर बसली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास निगडी ठाण्याचे उपनिरीक्षक नाना मोरे करीत आहेत.