भरधाव टँकरच्या धडकेत जळगावची महिला ठार

0

नशिराबादजवळ अपघात ; दुचाकीस्वार पती जखमी

भुसावळ : भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा मृत्यू झाला तर पती जखमी झाल्याची घटना नशिराबादजवळील सरस्वती फोर्डजवळ मंगळवारी सकाळी 11.35 वाजेच्या सुमारास घडली.

या अपघातात मंगला रवींद्र चौधरी (50, रामचंद्र नगर, जळगाव) यांचा मृत्यू झाला तर त्यांचे ती रवींद्र चौधरी जखमी झाले. जखमी अवस्थेत मंगला चौधरी यांना गोदावरी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी डॉ.श्रीकांत जाधव यांच्या खबरीनुसार नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अपघातानंतर टँकर चालक पसार झाला असून पोलिसांनी टँकर जप्त करीत पोलीस ठाण्यात आणल्याचे सूत्रांनी सांगितले.