पाचोरा ः तालुक्यातील वरखेडी येथील विवाहितेचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. सोमवार, 14 रोजी रेल्वे उड्डाणपुलाजवळ अपघात झाला. या अपघातात विवाहिता सुल्ताना बी.शकील काकर (33, रा.वरखेडी) यांचा मृत्यू झाला.
वडिलांना भेटण्यासाठी जाताना गाठले मृत्यू
विवाहिता सुल्ताना या पतीसोबत वडिलांना दवाखान्यात भेटण्यासाठी दुचाकी जात असताना जारगाव चौफुलीकडुन भडगावच्या दिशेने जाणार्या टेम्पो ट्रॅव्हलर (एम.एच.19 वाय. 6385) ने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागील बाजुस बसलेल्या सुल्ताना बी.शकील काकर ह्या खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती गंभीर असल्याने जळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील टेम्पो ट्रॅव्हलर व चालक यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे करीत आहे. मयत सुल्ताना बी.शकील काकर यांच्या पश्चात पती, मुलगी, दोन मुले असा परीवार आहे.