भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; तरूण जागीच ठार

0

जळगाव- जळगाव-औरंगाबाद रस्यावरील चारचाकीच्या शोरूमध्ये कामाला जात असलेल्या सेल्स एक्झीकेटीव्ह तरूणाच्या दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास कृषि उत्पन्न बाजार समितीसमोर घडली. मुशरिफ सत्तार खान (वय-३०, रा. जुनी पोलीस वसाहत) असे मयत तरूणाचे नाव आहेत. अपघात एवढा भिषण होती की, तरूणाने हेल्मेट घातलेले हेल्मेटचा देखील चुराडा झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी की, अशराफ खान हे चारचाकी वाहनाच्या शो रुममध्ये कामाला असून नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी सकाळी दुचाकीने कामावर जात होते. त्यावेळी समोरून एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्या वेळी अशराफ खान यांनी दुचाकी डाव्या बाजूला घेतली व त्याच वेळी मागून येणाऱ्या गॅस टँकरने जोरदार धडक दिली. यात अशरफ यांच्या डोक्याला जबर मार लगून ते जागीच ठार झाले. अपघातानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.अपघात होताच मोठा आवाज झाला. परंतू, अपघात होताच चालक हा ट्रक घेऊन पसार झाला.