शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूरजवळील सावळदे गावाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील आईसह मुलाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी घडला. राधा राला गुथरे (27) व मुलगा आदित्य अशी मृतांची नावे आहेत.
जागीच माय-लेकांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील वरला तालुक्यातील कुंडिया येथील रहिवासी राला खुमाण गोथरे हे कुटुंबासह मालेगावजवळील उमराणा येथे मजुरीच्या कामासाठी आले होते व रविवारी दुचाकी (एम.पी.46 एम.एस.-9996) ने उमराणा येथून कुंडिया, ता.वरला येथे जात असताना मुंबई-आग्रा महामार्गावर सावळदे गावाच्या पुढे शिरपूरच्या दिशेने जाणार्या ट्रक (एम.पी.07 एच.बी.4652) ने दुचाकीला उडवल्याने आदित्य व राधा गुथरे यांचा मृत्यू झाला.