भरधाव ट्रकची रीक्षाला धडक ; भुसावळातील चालक जागीच ठार

0

तीन प्रवासी जखमी ; मुक्ताईनगरजवळ मध्यरात्री अपघात

मुक्ताईनगर- भरधाव ट्रकने व रीक्षात समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात रीक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला तर रीक्षातील अन्य तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वरील यादव ढाब्याजवळ मंगळवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

भरधाव ट्रकने समोरून दिली धडक
मुक्ताईनगरहून भुसावळकडे प्रवासी घेवून निघालेली प्रवासी रीक्षाला (एम.एच.19 व्ही.1705) भुसावळकडून मुक्ताईनगरकडे येणार्‍या ट्रक (एम.एच.39 पी.3931) ने समोरून धडक दिल्याने रीक्षा चालक फकिरा बाबू तडवी (रा.खडका रोड, भुसावळ) जागीच ठार झाला तर रीक्षातील अन्य प्रवासी संदीप अमृत पाटील (भुसावळ), रमेश हरी भिडे (कोथळी), संतोष आठवले (नागपूर) हे जखमी झाले. अपघातात रीक्षाचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी बुधवारी दुपारी हमीद तडवी (रा.जुने गाव, भवानी मंदिर, मुक्ताईनगर) यांनी मुक्ताईनगर पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध (नाव, गाव माहित नाही) गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजीव पाटील करीत आहेत.