भरधाव ट्रकच्या धडकेत रेल्वे गँगमन ठार

0

नवोदय विद्यालयाजवळ अपघात; ट्रक ताब्यात

भुसावळ– भादली येथे कर्तव्यावर जात असलेल्या रेल्वे गँगमनला भरधाव ट्रकने धडक दिल्याने गँगमनचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयाजवळ झाला. संजयकुमार रतीलाल सोनवणे (33, शांती नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. सोनवणे हे दुचाकी (एम.एच.19 बी.ई.2567) ने भादली येथे जात असताना समोरून येत असलेला ट्रक (जे.के.01 ए.ए.6227) ने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचे चाक निखळून काही अंतरावर जावून पडले तर ट्रकच्या धडकेने अपघात स्थळानजीकचा इलेक्ट्रीक खांब कोसळला.