भल्या पहाटे स्त्याचा अंदाज न आल्याने अपघात ; गावावर शोककळा
फैजपूर- भल्या पहाटे रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव ट्रकने उडवल्याने बामणोद येथील 68 वर्षीय वृद्धा जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे भुसावळ-फैजपूर रस्त्यावरील वनोली फाट्याजवळ घडली. इंदूबाई नारायण पाचपांडे (68) असे मयत वृद्धेचे नाव आहे. या घटनेने बामणोद गावावर शोककळा पसरली आहे.
शेतात जाताना गाठले मृत्यू
गावापासून जवळच असलेल्या गोपाळ फिरके यांच्या शेतात इंदूबाई पाचपांडे व त्यांच्या स्नू सीमा पाचपांडे या पापड करण्यासाठी जात असतांना लुम्बिनी नगराजवळील वनोली फाट्याजवळ मागून भरधाव वेगाने येणारा ट्रक (एच.आर.73-9909) वरील चालकास पुढच्या वळणाचा अंदाज न आल्याने त्याने ट्रक सरळ वृद्ध महिलेच अंगावर घातल्याने चेहर्यावर जबर मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला तर आजूबाजूच्या नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातस्थळी फैजपूर पोलिस ठाण्याचे एपीआय दत्तात्रय निकम, सहकारी विजय पाचपोळ, उमेश पाटील, चालक सोनवणे यांनी धाव घेत मृतदेह यावल येथे विच्छेदनासाठी हलवला. अज्ञात ट्रक चालकाविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.