भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

0

पिंपरी : भरधाव वेगात जाणा-या दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणा-या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना महावीर चौक चिंचवड येथे बुधवारी (दि. 14) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. लक्ष्मण यल्लप्पा मोन (वय 45, रा. पडवळनगर, थेरगाव) असे भरधाव वेगात जाणा-या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अमोल शिंगटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख अदयाप पटली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण (वय अंदाजे 30 वर्ष) चिंचवड मधील महावीर चौकातून पायी चालत जात होता. चौकात आल्यानंतर तो रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने (एम एच 14 / एफ 8591) त्याला जोरात धडक दिली. यामध्ये त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटली नाही. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.