भरधाव दुचाकी झाडावर आदळून एक जण ठार

0
मुक्ताईनगर : भरधाव दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना वढोदा रस्त्यावर घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत संदीप रामदास डोफे (36, रा. वढोदा) यांचा मृत्यू झाला. दि. 15 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास कुऱ्हा-वडोदा रस्त्याने दुचाकी ( क्रमांक एम.एच.28 एव्ही-1535) ने भरधाव जात असताना दुचाकी वरील ताबा सुटून ती झाडावर आदळली. या घटनेत संदीप डोफे मयत झाले. या प्रकरणी वसंत प्रल्हाद वाघमारे यांनी मुक्ताईनगर पोलिसात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार शेजोले हे करीत आहेत.