भरधाव पॅजो रीक्षा ट्रॅक्टरवर धडकली : रीक्षा चालक जखमी

जळगाव : भरधाव वेगाने जाणारी अ‍ॅपे रीक्षा समोरून येणार्‍या ट्रॅक्टरवर जावून धडकल्यानंतर अपघातात रीक्षा चालक जखमी झाला तर रीक्षाचे नुकसान झाले. या प्रकरणी रीक्षा चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
नाशिक येथील नांदगाव तालुक्यातील येवला येथील राजेंद्र कारभारी साळवे (39) हे ट्रॅक्टर चालक आहे. ते रविवार, 5 जून रोजी सांयकाळी 6.30 वाजेच्या सुमारास (एम.एच.41 जे.7507) या क्रमांकाचे ट्रॅक्टर घेवून शिरसोली रोडवरुन जकातनाका दरम्यान जात असतांना समोरुन भरधाव वेगाने येणार्या अ‍ॅपे रीक्षाने त्यांच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यात दोघा वाहनांचे नुकसान झाले. अ‍ॅपे चालक नवनीत पाटील (रायसोनी नगर) हे जखमी झाले आहे. राजेंद्र साळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सोमवार, 6 जून रोजी सकाळी आठ वाजता रीक्षा चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अल्ताफ पठाण करीत आहे.