सरवड टोलनाक्याजवळील घटना ; अपघातानंतर महामार्ग ठप्प
धुळे- भरधाव बसने उडवल्याने कापडणे येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील सासवड टोलनाक्याजवळ शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात वसंत राजाराम भील (40) व त्यांचा मुलगा श्याम वसंत भील (12, दोन्ही रा.कापडणे) हे दोघे जागीच ठार झाले.
अपघातानंतर नागरीकांनी रोखला महामार्ग
कापडणे येथील पिता-पूत्रा सरवडला लग्नासाठी दुचाकी (एम.एच.18 ए.एल.6179) ने रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना शिरपूरकडून धुळ्याकडे येणारी बस (एम.एच.14 बी.टी.2218) ने दुचाकीला जोरदार धडक दिली़ या अपघातात दोघा पिता-पूत्रांना जबर फटका बसल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. घटनेची माहिती गावात पसरताच गावातील नागरीकांनी महामार्ग रोखून धरला होता. अपघातानंतर महामार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.