भरधाव रस्त्यावर ट्रक उलटल्याने तरुणाचा मृत्यू : सात जण जखमी

A truck loaded with cotton overturned as it was hit by a collision : a youth in Mukti was killed; Seven people were injured जळगाव : कापसाने भरलेल्या ट्रकला समोरून वाहनाने हुलकावणी दिल्यानंतर ट्रक उलटल्याने मुकटीतील तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य सात जण जखमी झाले. हा अपघात ममुराबाद-विदगाव रस्त्यावरील फार्मसी महाविद्यालयाजवळ गुरुवारी दुपारी तीन वाजता घडला. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. राज रवींद्र अहिरे-भिल (20, रा.मुकटी, जि.धुळे) असे मयताचे नाव आहे.

हुलकावणीमुळे ट्रक उलटला
धुळे जिल्ह्यातील मुकटी येथील ट्रक (एम.एच.18 एए 1080) हा ट्रक मजुरासह यावल येथील डांभूर्णी येथे कापूस भरण्याासाठी गेला होता. गुरुवारी सकाळी ट्रकमध्ये कापूस भरून परत मुकटीकडे नेला जात असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील फार्मसी कॉलेजजवळून जात असताना समोरून येणार्‍या अज्ञात वाहनाने कट मारल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक उलटला.

मुकटीच्या तरुणाचा मृत्यू
या अपघातात राज रवींद्र अहिरे भिल (20, मुकटी, जि.धुळे) या तरुणाचा मृत्यू ओढवला तर प्रमोद संभाजी पाटील (40), भरत दगडू पाटील (32), दिगंबर दिलीप पाटील (30), रवींद्र बारकू भिल-अहिरे (50), जितेंद्र पवार (35), निंबा दगडू पाटील (36) आणि बुधा पाटील (60, सर्व राहणार मुकटी) हे जखमी झाले आहेत. जखमींनवर तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आल्यानंतर उपचार सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.