जळगाव – सकाळी दुध घेण्यासाठी गेलेल्या आजोबांना रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भोईटे रेल्वे
गेट जवळ घडली असून याबाबत पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की,
दिनेश मयाराम सोनवणे (वय-80) रा. पाडळसरे ता.अमळनेर ह.मु. भोईटे नगर हे महानगरापालिका शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते.
नेहमीप्रमाणे दुध घेण्यासाठी आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास पिशवी घेवून घरातून गेले. रेल्वे गेटजवळून जात असतांना समोरून भरधाव
वेगाने येणाऱ्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेजारी राहणारे मनोज राणे यांनी रिक्षातून जिल्हा
रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा
परीवार आहे.