Pazzo driver dies in Dharangaon collision with unknown vehicle धरणगाव : पाठीमागून आलेले भरधाव वाहन पॅजो रीक्षावर आदळून झालेल्या अपघातात धरणगावातील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी घडला. आशिश गजानन भावसार (32, पारोळा नाका, धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पॅजो बंद पडताच मागून आदळले वाहन
आशिश हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता व किरकोळ धान्य विक्री करून आपला उदरनिर्वाह करत होता. धान्य विक्रीसाठी तो धरणगाव तालुक्यातील खेडेगावांमध्ये जात होता. यासाठी त्याच्याकडे पॅजो रीक्षा होती. रविवार, 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता आशिष हा पॅजो रीक्षा (एम.एच.15 ई.जी.6305) ने चोपडा रोडने निघाला असताना कमल जिनिंगजवळ त्याची गाडी अचानक बंद पडली. त्याच वेळी मागून भरधाव वेगाने येणार्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने आशिषच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. नागरीकांनी त्याला तातडीने उपचारासाठी जळगाव येथे हलवले रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने भावसार कुटुंबियांवर संकट कोसळले आहे. पाच बहिणींचा एकूलता एक भाऊ गेल्याचे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.