Blown up by a speeding vehicle on Amoda-Bamanod road : Death of a saint from Ghat फैजपूर : भरधाव वाहनाने रस्ता ओलांडणार्या प्रौढाला धडक दिल्याने गाते, ता.रावेर येथील 79 वर्षीय संताचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी कठोरा येथील वाहन चालकाविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
जबर धडकेने जागीच मृत्यू
आमोदा-बामणोद रस्त्यावर शुक्रवार, 25 रोजी सकाळी 10 वाजता बाबू महाराज रायतकर (79, ह.मु.गाते, ता.रावेर) रस्ता ओलांडत असताना संशयीत चेतन प्रकाश कोळी (कठोरा, ता.यावल) याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवत बाबू महाराजांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना उपचारार्थ हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
वाहन चालकाविरोधात गुन्हा
अपघातानंतर सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे व सहकार्यांनी भेट दिली. या प्रकरणी संतोष एकनाथ पाटील (52, गाते) यांनी फिर्याद दिल्यावरून चेतन प्रकाश कोळी (कठोरा) विरोधात फैजपूर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार पांडुरंग सपकाळे करीत आहेत.