भरधाव वेगाच्या नादात टँकर पलटी

0

धुळे । मुंबई -आग्रा महामार्गवरील हॉटेल नालंदा जवळ भरधाव वेगाने जाणार्‍या तेलाचा टँकर आणि कार यांच्यात अपघात झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. टँकर रस्त्याच्या बाजूला उलटल्याने सुदैवाने कोणतेही जिवीतहानी झाली नाही. काज क्रमांक (एमएच 39 एबी 1127) आणि टँकर क्रमांक (आरजे 47 जीए 1734) यांच्यात समोरासमोर अपघात झाला यात कारच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले तर, जोरदार अपघातामुळे तेलाचा टँकर रस्त्याच्या बाजूला उलटला यात टँकर चालक आणि सहचालक किरकोळ जखमी झाले.  तेल पडत असल्यामुळे मात्र तेल चोरणार्‍यांनी गर्दी केली होती. या अपघातातमुळे महामार्गावर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लाबच लाब रांगा लागले होते. घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.