भररस्त्यात गोळीबार करुन तरुणाने केली आत्महत्या

0

रायगड : पनवेल नेरे येथे राहणाऱ्या तेजस फडके (वय २५) या तरुणाने सोमवारी रात्री पारिजात सोसायटी परिसरातील कारमेल शाळेजवळ गोळीबार केला. काही वेळाच त्याने देखील आत्महत्या केली आहे.

तेजस हा मद्यधूंद अवस्थेत होता. तिथून पळून गेल्यावर त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह पेणमधील पशुवैद्यकीय रुग्णालयाजवळ एका कारमध्ये सापडला. या संपूर्ण घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तेजस तिथे काय करत होता, त्याने गोळीबार कोणावर केला, याबाबतचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.