इंदूर : देशात लहान मुली आणि स्त्रियांवरील बलात्काराच्या घटना घडत असतानाच मध्यप्रदेशातील इंदूर शहरात भररस्त्यात एका मॉडलचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्कुटरवरून जाणार्या दोन तरुणांनी या मॉडलचा स्कर्ट ओढला. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही मॉडल रस्त्यावर कोसळून जखमी झाली आहे.
या मॉडलने अनेक ट्विट करून ही धक्कादायक माहिती दिली आहे. मी दुचाकीवरून जात होते. दोन तरुणांनी माझा स्कर्ट खेचण्याचा प्रयत्न केला. या खाली काय आहे? असं ते स्कर्ट खेचताना बोलत होते. त्यांनी वारंवार स्कर्ट खेचल्याने माझे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मी कोसळले. त्यामुळे मला जबर मार लागला, असे या मॉडलने म्हटले आहे. इंदूरच्या गजबलेल्या रस्त्यावर ही घटना घडली. लोक पाहत होते. पण कोणीच मदतीसाठी पुढे आले नाही.