बोरद । नवापूर तालुक्यातील भरुड गावाजवळील नागन नदीवर मध्यम प्रकल्पाला आमदार उदेसिंग पाडवी यांनी नुकतीच भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. नागन संघर्ष समिती अध्यक्ष दिलीप नाईक ,बंधारपाडा, केली, केवडीपानी चे सरपंच किसन गावित व प्रकल्पग्रत नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी संबधित गावांचे शंभर टक्के पुनर्वसन व्हावे, अशी मागणी केली. तसेच कमाल पूर पातळी व बुडीत क्षेत्र (घरे व शेती) या बाबतचा फेर सर्वेक्षण प्रस्ताव अधीक्षक अभियंता यांच्याकडे प्रलंबित असून तो प्रस्ताव लवकर मंजूर व्हावा अशी ही मागणी त्यांनी आ.पाडवी यांच्या कडे केली.
मोठ्या प्रमाणात पाणीसाठा
विधानसभा अधिवेशन संपल्यावर विनंती अर्ज समितीची बैठक घेऊन नागन प्रकल्पग्रस्त्च्या पुनर्वसन व निधींबाबत सविस्तर चर्चा होऊन या मोठ्या विस्ताराच्या धरणाचे बांधकाम काळ्या मातीत न करतात मुरमाळ मातीत केल्याने धरण बांधकाम पावसाळ्यात धसते.परिणामी मोठी जीवित व वित्त हानी होऊ शकते. या बाबतही विनंती अर्ज समितीच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. नागन प्रकल्प नियोजनानुसार धरण पूर्ण केल्यास 23.62 दश लक्ष घनमीटर सिंचनासाठी व 18.35 दश लक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे .अशी माहिती आमदार उदेसिंग पाडवी यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
3356 हेक्टर सिंचनाखाली येणार
केली व केवडीपाणी या गावांना जोडणारा पूल पावसाळ्यात 10 ते 15 फूट पाण्याखाली जाऊन दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. तथापी त्या पुलाची जागा बदलावी त्याचप्रमाणे कालवा भूसंपादन व बांधकामासाठी लागणारा निधी त्वरित उपलब्ध करून मिळावा अशा अनेक मागण्या आमदार पाडवी यांच्याकडे करण्यात आली आहे. या प्रकल्पाला 33 वर्ष असून आज ही हा प्रकल्प पुनर्वसन व पुराच्या नैसर्गिक आपत्ती उपाययोजनाच्या अभावी अधिकाऱयांच्या लालफितीत अडकला आहे .त्यामुळे अजून बाधितांना योग्य न्याय मिळू शकलेला नाही. तसे नियोजनानुसार प्रकल्प पूर्ण झाल्यास येथिल 3356 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून येथील आदिवासी शेतकर्यांचे जीवनमान सुधारणार आहे.
तक्रारदारांची साक्ष होणार
हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आ.पाडवी यांनी पावसाळी अधिवेशनात विधिमंडळ अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची मंजुरी घेऊन विधिमंडळ पटलावर ठेवला आहे. याबाबत संबधित विभागाने तपशीलावर माहिती सिंचन विभागाच्या अधिकार्याकडून मागवली असून सादर विंनती अर्ज समितीच्या बैठकीत प्रधान सचिव ,अप्पर सचिव यांच्या स्वाक्षर्या होतील. तसेच ज्यांनी या बाबत तक्रार केली आहे