भवानीपेठेत बंगाली करागीरकडून 95 ग्रॅम सोन्याची चोरी

0
जळगाव – सोन्यापासून दागीने बनविण्यासाठी मोठ्या विश्वासाने दिलेले 95.800 ग्रॅमचे सोने बंगाली कारागीरला दिले होते. त्याच कारागीरने सोन्याची 95 ग्रॅम सोन्याची चीप असे 2 लाख 70 हजार रूपये किंमतीचे सोने घेवून पळ काढल्याची घटना आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली असून शनिपेठ पोलीसात बंगाली कारागीर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, अश्विन सज्जनराज सोनी (वय-31) रा. लोकमान्य हाऊसिंग सोसायटी, रिंगरोड, जळगाव यांचे दागिने बनविण्याचा व्यवसाय असून त्याचे भवानी पेठेत दुकानदेखील आहे. त्यांनी आरोपी बंगाली कारागीर साहेब स्वपन आरी (वय-21) रा. महाराजपूर थाना, ता. घाटाल जि.पश्चिम मिदनापूर कलकत्ता याच्याकडे 2 लाख 70 हजार रूपये किंमतीचे 95.800 ग्रॅम साने दागीने बनविण्यासाठी दिले होते. मात्र आरोपी साहेब स्वपन आरी याने दागीने न बनविता त्यांने सोनेच घेवून सकाळी 3 वाजेच्या सुमारास घेवून पसार झाला. ही घटना लक्षात आल्यानंतर तातडीने आश्विन सोनी यांनी शनिपेठ यांना कळविले. त्यानुसार सोनी यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीसात आरोपी  साहेब स्वपन आरी यांच्या विरोधात चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय सुरेश सपकाळे करीत आहे.