भुसावळातील हिरा नगरात अमृत योजनेच्या जलकुंभाचे भूमिपूजन
भुसावळ- भविष्यात पाणीप्रश्न बिकट बनणार असून त्यासाठी आतापासून पाणी जपून व काटकसरीने वापरण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी केले. ते म्हणाले की, शहरातील हिरा नगरातील पाणीप्रश्न अनेक वर्षानंतर सुटणार आहे. या भागातील अनेक रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून लवकरच अन्य कामेदेखील होणार असल्याचे ते म्हणाले. शहरातील हिरा नगरात अमृत योजनेंतर्गत साडेपाच लाख लीटर क्षमतेच्या जलकुंभाचे भूमिपूजन शुक्रवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
अमृत योजनेतून मिळणार दिलासा -नगराध्यक्ष
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, हिरा नगरातील जनतेला व ह्या भागातील लोकांना पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असल्याने या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला मात्र आता अमृत योजनेमुळे थेट शेवटच्या घटकापर्यंत व उंचावर पाणी पोहोचणार असल्याने नागरीकांचे हाल कमी होतील. राजस्थान मार्बल, महेश नगर, गायत्री नगर, बालाजी नगर, विकास कॉलनी, शिव कॉलनी, पंढरीनाथ नगर, अमरनाथ नगर, तुकाराम नगर, हिरा नगर भागात पाणीपुरवठा होईल, असे ही म्हणाले.
यांची होती उपस्थिती
नगरसेवक किरण कोलते, रमाकांत महाजन, नगरसेविका सोनल महाजन, पराग भोळे यांच्यासह या भागातील रहिवासी बाळू ठाकूऱ, बाळू झांबरे, अशोक ठाकूर, प्रकाश तारे, मोहन वारके,एल,टी.वकारे, गिरधर नारखेडे,उषा झांबरे, सरोज ठाकूर, वसुंधरा वकारे, प्रल्हाद राजपूत, कोकिळा कोळी, आशा पाटील, लिलाधर साळी, कल्पना पाटील, रत्नमाला नायसे, कल्पना साळी आदी महिला उपस्थित होत्या.