भष्ट्राचाराच्या चक्रव्यूहात अडकला पुनखेड्याचा पुल

0

भोकर नदीवर ब्रिटीशांना जमले ते महाराष्ट्र शासनाला जमले नाही : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

रावेर (शालिक महाजन) : रावेर तालुक्यातील पुनखेड्याच्या भोकर नदीवर स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी बनविलेला रेल्वेच्या पुलावरुन आजही शेकडो रेल्वे दरोरोज ये-जा करतात तर त्याच्याच खाली महाराष्ट्र शासनाच्या इंजिनियरने तयार केलेला पूल भष्ट्राचाराच्या चक्रव्यूहात अडकुन भोकर नदीवरून मुक्ती मागत आहे. पूर्वीच्या इंग्रजांनी रेल्वेसाठी तर आताच्या महाराष्ट्र शासनाने वाहनांसाठी पुनखेडा नजीक वेग-वेगळे पुल जनतेसाठी तयार केले आहे. यात भष्ट्राचार आणि इमानदारी केलेल्या पुलांची पाहणी करायची असेल तर रावेर तालुक्यातील पुनखेडानजीक भोकर नदीवर यावे लागेल म्हणजे याचा प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. इंग्रजांनी इमानदारी व मेहनतीने तयार केलेल्या पुलावरुन शेकडो रेल्वेगाड्या दरोरोज ये-जा करतात तर भष्ट्राचार आणि निकृष्ट कामामुळे तयार झालेला पूल वाहनांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसाळ्यात भोकर नदीला पाणी आल्या नंतर या परीरसरातील नागरीक, विद्यार्थी महाराष्ट्र शासनाचा पुल बंद राहत असल्याने इंग्रजांनी बनवलेल्या पुलावरून रावेरच्या दिशेने येतात आजही या गावच्या नागरीकांना या पुलाबद्दल विचारले असता त्यांनी भष्ट्राचार व निकृष्ट पुलाबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला. आपल्या पेक्षा इंग्रज बरे होते, अशी भावनाही व्यक्त झाली. अनेकवेळा या पुलाची दुरुस्ती झाली पण निकृष्ट कामामुळे लगेच हा पुल मरणा अवस्थेत गेल्याचे येथील नागरीक सांगतात.

लोकप्रतिनिधी आलबेल
पुनखेडा भोकर नदीवरील पुलाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भावना बोथड झालेल्या दिसतात. खासदार रक्षा खडसे रावेरला येतांना याच पुलावरुन येतात परंतु त्यांनदेखील या पुलाबाबत सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे तर स्थानिक आमदार, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या लोकप्रतिनिधीचेदेखील दुर्लक्ष आहे.

पावसाळ्यात पुल असतो बंद
आता उन्हाळा सुरू असून पावसाळ्यात तर हा पुल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असतो म्हणून पुनखेडा, पातोंडी भागातील लोक विद्यार्थी इंग्रजकालीन रेल्वे पुलावरुन आपली वाट काढतात त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने या बाबीकडे पाहणे गरजेचे आहे.