भांगरवाडी श्रीराम मंदिराचा शतक महोत्सव साजरा

0

लोणावळा : श्रीराम मंदिर भांगरवाडी येथील मंदिराचा शतक महोत्सवी वाटचाल कार्यक्रम उत्साहात पार पडला. 1901 साली भांगरवाडी येथे पुरुषोत्तमदास दामोदरे व भगिनीबाई जमनाबाई, मावजी हरिदास बाई मोघींबाई, वसनजी शामजी यांनी हे मंदिर बांधले, सुमारे 17 वर्ष या मंदिराचे काम सुरू होते. 1 एप्रिल 1917 रोजी रामनवमीच्या मुर्हतावर सदर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

संतकवी दासगणु महाराज यांच्या वास्तव्याने हा परिसर पावन झाला आहे. शिर्डी येथील रामनवमीचा उत्सव साजरा करून ते मुक्कामासाठी भांगरवाडी येथील श्रीराम मंदिरात येत असे. कै. विश्वनाथ जोशी यांनी स्थापनेपासून या मंदिरात सेवा केली, त्यांच्या पश्‍चात त्यांचे चिरंजीव मनोहर जोशी हे सेवा करत आहे. अशा या मंदिराच्या शतक महोत्सवी वाटचाली निमित्त आज मंदिराचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.