भांडणात मध्यस्थीचा रागातून चौघांना मारहाण

0
जळगाव – शहरातील संतोषी माता चौकात तरुणाने भांडणात मध्यस्थी केल्याचा राग आल्याने चौघांना त्याच्या घरात घुसून त्याला लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करीत सामानाची तोडफोड केली. ही घटना १०.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रझा कॉलनीतील अशफाक नुरा पटेल वय २० याने अनसखान आसीफखान मुलतानी रा.रजा कॉलनी याच्या भांडणांमध्ये मध्यस्थी केली होती. याचा राग आल्यामुळे अनसखान याच्यासह मुसाखान रमजानखान मुलतानी रा.रजा कॉलनी, युसूफ शेख अकील शेख रा.गेंदालाल मिल व निजामखान मासुमखान मुलतानी रा.मास्टर कॉलनी या चौघांनी अशफाक याच्या घरात घेवून त्याला लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच त्याच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली. या प्रकरणी अशफाक पटेल याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ संजय पाटील तपास करीत आहेत.