भांडण विसरून सलमान पोहचला प्रियांकाच्या रिसेप्शन पार्टीत

0

मुंबई : एके काळी बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि बॉलीवूडचा भाईजान सलमान खान या दोघांच्यात खूप चांगली मैत्री होती. मात्र, काही दिवसांपासून यांच्यात रुसवे फुगवे सुरू होते. प्रियांकानं ऐनवेळी त्याच्या बिग बजेट चित्रपटातून माघार घेतल्यानं सलमान तिच्यावर नाराज होता.

मात्र या साऱ्या गोष्टी बाजूला ठेऊन सलमान प्रियांकाच्या रिसेप्शन पार्टीत आला. या पार्टीत बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पण, या सगळ्यात लक्ष वेधलं ते सलमानच्या हजेरीने. यावरून दिसून आलेकी भाईजानने सगळ्या गोष्टी सोडून आपल्या मैत्रीला प्राधान्य दिले.