पुणे । कै. तळवलकर यांनी निधनापूर्वी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरास सुमारे पाच हजार ग्रंथ भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार तळवलकर कुटुंबीयांनी प्रदान केलेली ग्रंथसंपदा पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांच्या हस्ते शनिवारी भांडारकर संस्थेस प्रदान करण्यात आली. तसेच यावेळी या ग्रंथाच्या डिजिटलायझेशनसाठी 5 लाख रुपयांची देणगी तळवलकर कुटुंबीयांनी संस्थेला दिली.
स्व. तळवलकर स्मृती दालनाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. यावेळी माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी स्व. तळवलकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडले. गोविंदराव तळवलकर हे व्यासंगी पत्रकार, उत्तम टीकाकार, निस्पृह आणि एक मोठा माणूस होते, अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, संस्थेचे उपाध्यक्ष हरी नरके, माजी खासदार प्रदिप रावत, आमदार विजय काळे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.
म्हणाले की, संस्थेने गोविंदराव तळवलकर स्मृती दालन सुरू केले असून त्यामध्ये ग्रंथ, पुस्तके, संदर्भग्रंथ तसेच त्यांना मिळालेली बक्षिसे, स्मृतिचिन्हे ठेवली जाणार आहेत. सध्याच्या स्थितीत सुमारे 5 हजार ग्रंथ असून नजीकच्या काळात ही संख्या 25 हजारांपर्यंत नेण्याचा मानस आहे. या सर्व ग्रंथसंपदेचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असल्याचे श्रीकांत बहुलकर यांनी यावेळी सांगितले. संस्थेचे निबंधक श्रीनंद बापट यांनी सूत्रसंचालन केले व नियामक मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी आभार मानले.