जळगाव । एसएमआयटी महाविद्यालयाजवळील मुक्ताईनगर पावडरने भांडी साफ करून देतो असे सांगत दोन अज्ञात व्यक्ती घरात घुसून वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची घटना बुधवार रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली असून दोन्ही भामट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसएमआयटी महाविद्यालयाजवळ राहणारे अनिल गोविंद चौधरी हे आई-वडील व पत्नीसोबत राहतात. मुलांना सुट्टी असल्याने पत्नी माहेरी गेल्या होत्या. अनिल चौधरी यांचे गावात दुकान असल्याने सकाळी दुकानावर जाण्यासाठी घरातून निघाले. त्यावेळी आई इंदूबाई गोविंद चौधरी आणि वडील गोविंद चौधरी हे दोघेच घरात होते. अनिल चौधरी बाहेर निघाल्यानंतर काही वेळा अज्ञात दोन भामटे घरात घुसून आम्ही घरातील भांडे साफकरून चमकवून देतो असे सांगितले. त्यावर गोविंद चौधरी यांनी नकार दिल्यानंतर घरात त्यातील एक भामटा इंदूबाई चौधरी यांच्याकडे जावून तांब्याचे दोन भांडे चमकवून दिले. तांब्याची भांड्यासह सोने देखील कमी दरात चकचकीत करून देत असल्याचे सांगत तुमच्या हातातील बांगड्याही चमकवून देत असल्याचे बोलत बोलत त्यांनी हाताला शंपू लावून हातातील 34.500 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या.
नजर चुकवून केला कारभार
इंदूबाई यांच्या हातातील बांगड्या काढून घेतल्यानंतर चोरट्यांनी भांडे घेवून पाणी, पावडर आणि हळद टाकून मिश्रण देवून पाण्यात काहीतरी टाकू दिले. त्यानंतर त्यांनी घरातून पळ काढला. सुरूवातीला गोविंद चौधरी यांनी पत्नी इंदूबाई यांना बांगड्या काढून न देण्याचे बजावत होते. त्यावेळी एकाने गोविंद चौधरी यांना बोलण्यात अडकवून धरले आणि दुसर्याने हात चालाखीने हातातील 34.400 ग्रॅम वजनाच्या 85 हजार रूपयांच्या बांगड्या घेवून फरार झाले.