भाईजानचा आज ५३वा वाढदिवस !

0

मुंबई : बॉलीवूडचा भाईजान, बॉलीवूडचा वॉन्टेड मॅन, बॉलीवूडचा दबंग, बॉलीवूडचा गॉडफादर, बॉलीवूडचा टायगर असे अनेक नावे असणारा अभिनेता सलमान खानचा आज ५३वा वाढदिवस आहे. सलमान आज ५३ वर्षांचा झाला आहे तरीही त्याची फिमेल फॅन्स काही कमी झालेले नाहीत.

सलमानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या हिंदी चित्रपटातील भूमिकेद्वारे बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती. १९८९ साली सलमानाने प्रमुख नायकाची भूमिका साकारलेल्या ‘मैने प्यार किया’ या हिंदी चित्रपटाने प्रचंड यश मिळविले. त्यावर्षीचा फिल्मफेअर पुरस्कारही सलमानने देखील त्यालाच मिळाला होता.