भुसावळ। मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेडा येथे शेतात गुरे शिरल्याच्या कारणातून भाऊबंदकीत जोरदार वाद उफाळल्याने भावावरच लाकडी दांड्याने हल्ला करीत त्यास गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना 16 रोजी रात्री आठ वाजता घडली.
समाधान निनाजी गवई (63, तालखेडा) यांनी फिर्याद दिली की, त्यांच्या शेतात मोकाट गुरे शिरल्याने त्यांना बाहेर काढल्यानंतर ही गुरे संशयीत आरोपींच्या शेतात शिरल्याने राहुल निनाजी गवई व सुनील निनाजी गवई यांनी लाकडी दांड्याने मारहाण करीत जखमी केले. मुक्ताईनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. समाधान यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरु आहे. तपास सहाय्यक पोेलीस निरीक्षक कडूकार करीत आहेत.