पुणे । सार्वजनिक गणेशोत्सव यंदा 126 व्या वर्षात पदार्पण करत आहे. असे असताना पुणे महानगरपालिका सार्वजनिक गणेश उत्सवाचे 125 वे वर्ष म्हणून साजरे करीत आहे. या निर्णयाचा भाऊ रंगारी मंडळाकडून विरोध करण्यात आला असून शनिवारी मंडई चौकात कार्यकर्त्यांनी काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन करीत महापालिकेचा निषेध नोंदवला.
या विषयी मंडळाचे म्हणाले की, सार्वजनिक गणेश उत्सवाचे यंदाचे 126 वे वर्ष असल्याचे पुराव्यासहीत महापालिका ते पंतप्रधाना कार्यालयामध्ये पत्र व्यवहार करण्यात आला. ही निषेधार्थ बाब असून त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असे मंडळाचे विश्वस्त सूरज रेणुसे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Prev Post