नांदेड । केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्वसामान्य, कामगार, कष्टकरी, शेतकरी, छोट्या-मोठ्या उद्योजकांच्या विरोधात धोरण घेत असून रोजगार निर्मिती तर सोडाच पकोडे तळण्याचे काम सुशिक्षितांच्या माथी मारत आहेत. पकोडे तळणे वाईट नसले तरी त्या कामातुन सन्मानजणक मोबदला मिळत नाही ही खरी अडचण असल्याचे सांगुन जनविरोधी धोरणे घेणार्या केंद्र व राज्यातील नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस सरकारला चलेजावचा इशारा देण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन उभारावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस डॉ.भालचंद्र कानगो यांनी केले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नांदेड जिल्हा शाखेच्या 23 व्या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी डॉ.कानगो हे नांदेडमध्ये आले होते. यावेळी पक्षाच्यावतीने आयटीआय येथून कलामंदिर पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. कलामंदिर येथे या रॅलीचे रुपांतर एका सभेत करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कम्युनिस्ट कार्यकर्ते कॉ.श्याम लाहोटी हे होते. रावेळी डॉ.कागणे रांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
माल्या-मोदी पळून जातांना झोपा काढता का?
100 कोटीच्या देशात प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षात लाखभर रोजगार देखील सरकारला उपलब्ध करुन देता आले नाहीत. सरकार सुशिक्षित बेरोजगारांना पकोडे तळण्याचा सल्ला देत आहे. पकोडे तळणे हे काही वाईट नाही. पण कुटुंबाचा निर्वाह होईल एवढा मोबदला तरी या व्यवसायातून मिळायला हवा. त्याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. जनधन योजनेच्या नावाखाली गोरगरीबांनी बँकेत जमा केलेले पैसेही या सरकारने काढून घेतले. सर्वसामान्यांना लाखभराचे कर्ज द्यायचे असेल तर ढिगभर कागदपत्रे मागणार्या सरकारने नीरव मोदी, विजय मल्ल्या यांना एका कागदावर अब्जावधी रुपये दिले. सर्वसामान्यांचा हा पैसा घेवुन मल्ल्या-मोदी यांनी देश सोडून पळ काढला. स्वतःला पहारेकरी म्हणून संबोधणारे पंतप्रधान मल्ल्या-मोदी पळून जातांना झोपा काढत होते काय?, असा सवालही डॉ कांगणे रांनी केला.