पिंपरी : विधानसभा निवडणुकीत गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यात सत्ता मिळाल्याचा विजयोत्सव पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात साजरा केला. यानिमित्त ढोल ताशा आणि फटाक्यांचा कडकडाट झाला. महिलांनी फुगड्यांचा फेर धरला. एकमेकांना पेढे भरवले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणांनी चौक दणाणून गेला. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामुळे दोन्ही आमदारांची अनुपस्थिती असली, तरी पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांसह महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, सदाशिव खाडे, उमा खापरे, नगरसेवक उत्तम केंदळे, बाबू नायर, केशव घोळवे, नामदेव ढाके, महिला आघाडी शहराध्यक्ष शैला मोळक आणि कार्यकर्ते यांचा समावेश होता.