मुंबई: कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएसच्या आमदारांनी राजीनामा देत सरकारला संकटात आणले आहे. राजीनामा देऊन आमदार मुंबईत दाखल झाले आहे, दरम्यान हे आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबून आहेत, त्या हॉटेलमध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड पोहोचले आहे. भाजपकडून कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु आहे.
10 आमदार मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये थांबले आहेत. काँग्रेस आणि जेडीएसने या आमदारांशी संपर्क साधू नये, यासाठीही भाजपा प्रयत्नशील आहे. मुंबईत आलेल्या आमदारांमध्ये 7 काँग्रेसचे, तीन जेडीएसचे आहेत.