नवी दिल्ली :- जम्मू-काश्मीरातील कठुआमधील एका ८ वर्षीय चिमुकल्या मुलीचे अपहरण करुन तिला रासना गावातील एका मंदिरात बंदी बनवून तिच्यावर सामुहिक बलात्कार करून खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. तसेच उन्नाव पाशवी बलात्कार प्रकरणावरुनहि वादळ उठले आहे. यामध्ये संशयीत आरोपी हे भाजप नेत्यांशी संबध असल्याने भाजपवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. भाजपचे नाव बलत्कार जनता पार्टी असे असायला हवे, अशा शब्दात काँग्रेस नेते कमलनाथ यांनी टीका केली आहे.
कमलनाथ म्हणाले की, भाजपचे २० नेत्यांची नावे बलात्कारासंबंधी गुन्ह्यांशी जोडलेली आहेत. त्यामुळे भाजपचे नाव बलत्कार जनता पार्टी असायला हवे, याचा विचार जनतेने करावा, असेही ते म्हणाले. कमलनाथ यांनी भाजपावर जिव्हारी लागणारा वार केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.