पिंपरी : भाजपच्या वतीने ‘घर चलो अभियान’ हा उपक्रम सुरु केला आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांना बेघर करुन फसवे घर चलो अभियान’ राबविणार्या शहर भाजपचा शहर युवक काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. युवक काँग्रेस शहराध्यक्ष मयुर जैयस्वाल दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, भाजपने गेल्या काही वर्षात लोकांना बेघर करण्याचे काम सुरु केले आहे. महापालिकेमध्ये भाजपला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे.
तरीही शहरातील प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघाला नसून हे सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. असे असताना देखील हे फसवे अभियान राबविले जात आहे. केंद्रातील युपीए व राज्यातील आघाडी सरकारच्या काळात जेएनयुआरएम प्रकल्पाच्या माध्यमांतून पिंपरी-चिंचवड शहरातील अल्प उत्पन्न धारक व झोपडपट्टी धारकांसाठी घरे निर्माण करण्यासाठी प्राधान्य दिले गेले. मात्र, याच्या उलट पाऊले भाजपची सुरू आहेत.