मुंबई-आज राजकीय नेते असतील, बॉलिवूडमधील कलाकार असतील यांचे अधिकृत भाष्याचे साधन म्हणून ट्विटरकडे पहिले जात आहे. सोशल मीडियाचा वाढत वर्ग आणि लोकप्रियतेमुळे ट्विटरवर बोललेले वक्तव्य अधिकृत मानले जात आहे. एखादी घटना घडामोडी घडली असेल तर लागलीच ट्विटरवर त्याचे पडसाद दिसू लागते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचे ट्विट हे सारखेच असल्याचे आढळून आले आहे.
राष्ट्रवादी आयटी सेलची कमाल सगळ्या राष्ट्रवादी नेत्यांच्या हैंडलवरून एकाच भाषेत – एकाच रचणे समान ट्विटस – किती हास्यास्पद विरोधाभास आहे हा – म्हणजे विरोध करण्याच्या नादात आपलं हसं होत हे ही विसरले
???????????? pic.twitter.com/hFgYuOmk1o— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 7, 2018
याची भाजपने चांगलीच खिल्ली उडविली आहे. राष्ट्रवादी आयटी सेलची कमाल सगळ्या राष्ट्रवादी नेत्यांच्या हैंडलवरून एकाच भाषेत – एकाच रचणे समान ट्विटस – किती हास्यास्पद विरोधाभास आहे हा – म्हणजे विरोध करण्याच्या नादात आपलं हसं होत हे ही विसरले. असे भाजपने पक्षाच्या ट्विटर हॅन्डलवरून राष्ट्रवादीवर टीका केली आहे.