भाजपला मत दिल्याने सुनेची हत्या

0

अगरतला : त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुका 18 फेब्रुवारीरोजी पार पडल्या. निवडणुकीत एका आदिवासी महिलेने सासरच्या लोकांच्या विरोधात जाऊन भाजपला मत दिले. ही माहिती मिळताच पीडित महिलेचे सासरे, दीर व अन्य एकाने घरात घुसून महिलेला मारहाण केली. त्यात सून ठार झाली. शेजारी लोकांनी महिलेला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण, मारहाण करून हे दोघेही तेथून फरार झाले.

मारहाण झाल्याची माहिती मिळताच पीडित महिलेच्या पतीने तीन जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पण या प्रकरणी कुणाला अटक करण्यात आली नाही.