जळगाव। महानगर पालिकेच्या निवडणुकीला 18 महिन्याचा कालावधी बाकी आहे. या निवडणुकीची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरु केली असून पन्नासपेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. सोमवारी 20 रोजी भाजपाची रिंगरोड परिसरातील मंडळ क्रमांक 4 ची बैठक सत्यवल्यभ हॉल येथे पार पडली यात हा निर्धार करण्यात आला.
भाजपाची मिशन 50 प्लस या अभियानाची सुरुवात भाजपा स्थापना दिनानिमित्त 6 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. महानगर अध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, जिल्हा सरचिटणीस शिवदास साळुंखे, मंडळाध्यक्ष धिरज सोनवणे आदी कामकाज पाहणार आहे. डॉ.अश्विन सोनवणे, जयश्री पाटील, उपस्थितीत होते.