चाळीसगाव। तुर खरेदी संदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकर्यांविषयी अवहेलना कारक विधान केल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे रयत सेनेच्या वतीने 12 मे 2017 रोजी तहसील कार्यालय समोर रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला जोडामारो आंदोलन करण्यात आले. सत्ता मिळेपर्यंत शेतकर्यांना बाप म्हणणारे आता ‘सत्ता येताच रडतात साले’ असे शेतकरी बांधवांच्या विरोधात अवहेलना कारक वक्तव्य करणार्या रावसाहेब दानवेची भाजपा राष्ट्रीयअध्यक्ष अमित शहा यांनी भाजपा प्रदेशध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी, त्यांना पदावर राहण्याचा आधिकार नसुन रावसाहेब दानवेनी शेतकर्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा रावसाहेब दानवे ला महाराष्ट्रात फिरु दिले जाणार नाही, असा इशाराच रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी यावेळी दिला.
धरणगाव येथे तहसीलदारांना निवेदन
धरणगाव । येतील रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेतर्फे जाहिर निषेध करत तहसीलदार कैलास कडलग साहेब यांना निवेदन देतांना नगराध्यक्ष सलीम पटेल, ता.प्रमुख गजानन पाटील, राजेंद्र महाजन, भरत महाजन, संतोष महाजन, रवींद्र जाधव, दिपक पाटील, विलास महाजन, उमेश चौधरी, संजय चौधरी, धिरेद्र पुरभे,विशाल महाजन, विनय भावे, बंटी महाजन, नंदकिशोर पाटील, किरण मराठे, कमलेश बोरसे, राहुल रोकडे, बापू महाजन, गोपाल महाजन, हेमंत महाजन तसेच नगरसेवक सुरेश महाजन, वासुदेव चौधरी, अजय चव्हाण, अहमदखान पठाण व सम्पूर्ण पदाधिकारी व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध करुन त्यांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन करण्यात आले. सर्वच स्तरातुन त्यांच्या व्यक्तव्याबाबत निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मिडीयातुन देखील त्यांच्या व्यक्तव्याबाबत रोष व्यक्त होतांना दिसत आहे. या आंदोलनात रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, वाघडुचे माजी सरपंच भाऊसाहेब पाटील, प्रदेश सघटक पप्पु पाटील, सचिव प्रमोद वाघ, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष मयुर चौधरी, कार्याध्यक्ष भुषण पाटील, सागर पाटील, रोहित जाधव, विशाल निबाळकर, सागर गायकवाड, सागर धुमाळ, मुरलीधर कोठावदे, अनिल पाटील, केशव देवरे, महेंद्रसिंग महाले, कुलदिप पाटील, समाधान पाटील, बी.आर.पवार, चेतन पवार, सुरज पवार, अजय चव्हाण, श्रीकांत पवार, प्रदीप मराठे, रंगनाथ मांडोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.