पहूर : भाजपाचे विभागीय संघटक मंत्री रवि भुसारी यांचा नेरी येथे नियोजित कार्यक्रमांतर्गत असलेले दौर्यात पहुर येथे आपल्या वेळी सत्कार करण्यात आला. पहुर येथील भाजपाच्या काही कार्यकर्ते यांनी ऐनवेळी नियोजन करून कार्यक्रमाचे आयोजन करून बसस्थानकावर उत्तर महाराष्ट्र हटकर धनगर समाजाचे प्रमुख तथा ग्रामपंचायती सदस्य रामेश्वर पाटील यांनी त्यांचा जल्लोषात सत्कार केला. कार्यकर्त्यांची नगण्य उपस्थितीवर नाराजीचा स्वर न दाखवता त्यांनी पदाधिकार्यांशी चर्चा केली व नियोजित कार्यक्रम नेरी येथे असल्याने ते रवाना झाले. त्यांचा सोबत चंद्रकांत बाविस्कर होते. स्थानिक कार्यकर्ते राजधर पांडे, गणेश मंडलीक, संदीप बेहडे, अॅड.एस.आर.पाटील आदी उपस्थित होते.