भाजपातर्फे पक्ष स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

0

जळगाव। 6 एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा स्थापना तसेच पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भाजपा स्थापना दिन व पंडीत दिनदयाल उपाध्याय जन्म शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधुन पक्षातर्फे 6 ते 14 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व निवडणुक संपल्या असून पक्षातर्फे संघटनपर्व साजरा करण्यात येणार आहे. सप्ताहाभरात जिल्ह्याभरातील प्रत्येक गावात कार्यकर्ते ध्वज लावणार असून 50 हजार भिम अ‍ॅप वितरीत करण्यात येणार आहे. संघटनपर्व सप्ताहाच्या नियोजनासाठी भाजपा कार्यालयात पक्षकार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, संघटनमंत्री किशोर काळकर, पोपट भोळे आदी उपस्थित होते. संघटनपर्वासाठी दोनशे कार्यकर्ते निवडण्यात आले असून हे कार्यकर्ते पुर्णवेळ शताब्दी प्रचारक म्हणून कार्यकरणार आहे. प्रत्येक तालुकास्तरावर स्वागत समितीची स्थापना देखील करण्यात येणार आहे.