भाजपातील बंडखोरीवर अखेर शिक्कामोर्तब

नगरसेवक कुलभूषण पाटलांचा शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अर्ज

जळगाव – महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्याच नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेनेची साथ धरली आहे. भाजपाचे बंडखोर नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी आज शिवसेनेकडुन उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान शिवसेनेकडुन महापौर पदासाठी जयश्री सुनील महाजन यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजपाकडुनही महापौरपदासाठी भारती सोनवणे व प्रतिभा कापसे आणि उप महापौर पदासाठी सुरेश सोनवणे आणि मयुर कापसे यांनी अर्ज दाखल केले. उद्या दि. १८ रोजी सकाळी ११ वा. ऑनलाईन पध्दतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याने या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.