जळगाव । शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा महानगर दिव्यांग आघाडी तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. 13 रक्तदातांनी यावेळी रक्तदान केले.
यावेळी गरजू, गरीब मुलांचे वह्या व शैक्षणिक साहित्यासाठी अर्ज भरून घेण्यात आले. भोळे यांनी स्वःखर्चातु पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचे अर्ज भरून घेतले. यावेळी रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, डॉ.प्रसन्न कुमार रेदासनी, सुनिल माळी, उज्ज्वला वर्मा, वीरेंद्र बिराडे, प्रवीण पाटील. राहुल पाटील, गणेश पाटील, किशोर नेवे, जितु पाटील, दत्तु भदाणे, राजेंद्र वाणी, मनीषा दळवी, संगीता प्रजापत, प्रकाश सोनगिरे उपस्थित होते.