चोपडा । येथील भारतीय जनता पार्टीच्या चोसाका व्हा. चेअरमन शशिकांत देवरे व सूतगिरणी संचालक शशिकांत पाटील या दोघांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे दोघांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत भाजपा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके यांनी केली. रविवार 17 जून रोजी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्ष आत्माराम म्हाळके यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ते बोलत होते.
अधिकृत पत्र काढू
आत्माराम म्हाळके यांनी पुढे सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून भाजपाचे काही कार्यकर्ते पक्षविरोधी कारवाया करीत आहेत. त्यांची समजूत घालूनही त्यांनी पक्षविरोधी कृत्य सुरू ठेवले आहे. त्यामुळे भाजपचे चोसाका व्हा. चेअरमन शशिकांत देवरे व सूतगिरणी संचालक शशिकांत पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करीत असल्याची घोषणा केली. याबाबत आम्ही तसे पत्र काढून त्यांच्यावर कारवाई करणार असून त्यांनी केलेल्या चुकीच्या कामांशी भारतीय जनता पार्टीचा काहीएक संबंध असणार नाही. असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना सांगितले.
मान्यवरांची होती उपस्थिती
याप्रसंगी पं .स. सभापती आत्माराम माळके, शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, प्रदिप पाटील जिल्हा सरचिटणीस, हनुमंतराव महाजन तालुका सरचिटणीस ,जिल्हाउपाध्यक्षा ताराबाई पाटील, जि.प. सदस्य गजेंद्र सोनवणे ,उज्वला म्हाळके ,ज्योती राकेश पाटील ,प .स .सदस्य प्रतिभा पाटील, कृउबा संचालक , धनंजय पाटील, मगन बाविस्कर, प्रकाश पाटील युवा ता.अध्यक्ष, अॅड चौधरी माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर, माजी शहराध्यक्ष राजू शर्मा, सुतगिरणी संचालिका रंजना नेवे, प्रकाश पाटील,भाजप युवाशहाध्यक्ष तुषार पाठक, महिला शहराध्यक्ष ललिता सोनगिरे ,वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ नरेंद्र अग्रवाल, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष हरूण मिस्तरी ,अपंग सेल अध्यक्ष जोगिंदरसिंग जोहरी, तिलकचंद शहा, सरचिटणीस पंकज पाटील, विलास पाटील, मनिष पारिख ,राकेश पाटील ,भरत पाटील ,रविंद्र पाटील , इंद्रजित पाटील,.लक्ष्मण पाटील, भाईदास कोळी,विजय बाविस्कर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया सख्येँने उपस्थित होते.