भाजपा महानगर चिटणीसपदी अनिल सोनवणे यांची निवड

0

जळगाव । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराची महत्वपूर्ण नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनिल सोनवणे यांची भा.ज.पा. जळगाव जिल्हा महानगराच्या जिल्हा चिटणीस पदी नव्याने निवड करण्यात आली यांची नव्याने निवड जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांनी केली. अनिल सोनवणे यांना राजकीय क्षेत्रात ३० वर्षांचा दांडगा अनुभव असून राजकीय वारसा लाभलेला आहे. ते विविध सामजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे व योगदानामुळेच त्यांची जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जलसंपदामंत्री मा.ना. गिरीषभाऊ महाजन, विभागीय संघटन मंत्री किशोरभाऊ काळकर, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूभाई पटेल, जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, महेश जोशी भाजपा जिल्हा पदाधिकारी व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अनिल सोनवणे यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.