धरणगाव। धरणगाव शहरातील भाजप, राष्ट्रवादी काँगेस कार्यकर्त्यांनी मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. दिवसेंदिवस शिवसेना पक्षाचे संघटन हे वाढत आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी उपनगराध्यक्ष विजय महाजन, नगरसेवक पप्पू भावे, विलास महाजन, शहरप्रमुख राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते.
मुंबई येथे मातोश्रीवर उदझाला जाहीर प्रवेश
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष सलीमभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे शहरप्रमुख धिरेंद्र पुरभे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर महाजन, भाजपचे संजय गांधी निराधार योजना सदस्य विलास माळी, भाजप युवा मोर्चा धरणगाव शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लक्ष्मण महाजन, हेमंत महाजन, भाजपा मीडिया सेल प्रमुख टोनी महाजन यांचे लहान बंधू बंटीभाऊ महाजन, छोटू जाधव आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उपनगराध्यक्ष विजय महाजन, नगरसेवक पप्पू भावे, विलास महाजन, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, सतखेडा येथील सरपंच गजानन पाटील, मोतीलाल पाटील, राहुल रोकडे, पप्पू कंखरे तसेच सर्व शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.