भाजपा-शिवसेना सरकारविरोधात यावलला राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

0

भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी ; मागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन

यावल- भाजप-शिवसेना सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. दुपारी 12 वाजेला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते येथील शेतकी संघात एकत्र जमले. तेथून घेषणा देेत त्यांनी तहसील कार्यालय गाठले. तहसील कार्यालयाच्या आवारातदेखील मोदी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. तहसीलदार कुंदन हिरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात कापसाला आठ हजार भाव मिळालाचं पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीचं पाहिजे, पेट्रोल-डीझेलचे भाव कमी झाले पाहीजे, घरगुती गॅस सिलेंडरचे झालेली दुप्पट दरवाढ कमी झाली पाहिजे, बोंडअळी नुकसान भरपाई बागायतीप्रमाणे मिळाली पाहिजे, लोडशेडींग व वीजपुरवठा नियमित झाला पाहीजे, ज्वारी-मका खरेदी केंद्र त्वरीत सुरू झाले पाहिजे, मराठा, मुस्लीम, धनगर समाजाला त्वरीत आरक्षण मिळाले पाहिजे, रासायनिक खतांच्या किंमती कमी झाल्या पाहिजे, महागाईवर नियंत्रण ठेवुन वाढणारी महागाई कमी झाली पाहिजे व प्रलंबीत केळी पीक विमा मिळालाचं पाहिजे आदी मागण्या करण्यात आल्या.

यांचा आंदोलनात सहभाग
धरणे आंदोलनात तालुकाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य शुक्राम अण्णा पाटील, युवक अध्यक्ष देवकांत पाटील, किसान सेल अध्यक्ष वसंत पाटील, मागासवर्गीय अध्यक्ष सुकदेव बोदडे, लिगल सेल अध्यक्ष अ‍ॅड.निवृती पाटील, ओबीसी सेल अध्यक्ष निवृती धांडे, महिला अध्यक्ष व्दारकाबाई पाटील, भटक्या जाती अध्यक्ष चंद्रकात पाचपोळ, अल्पसंख्यांक अध्यक्ष शेख शाकीर, अन्वर खाटीक, करीम मन्यार, बापू जासूद, अशोक भालेराव, संजय पाटील, शिवराम वैदू, विजय साळी, प्रमोद पाटील, भगवान बरडे, सुरेखा पारधे, रईसाबाई खाटीक व पदाधिकारी उपस्थित होते.