धुळे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला तीन वर्षे पूर्ण होत झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात पक्ष संघटन व सदस्य नोंदणी अभियान सुरु झाले. या निमित्ताने प्रत्येक प्रभागात पक्ष प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. देवपुरातील दत्तमंदिर चौकात भारतीय जनता पक्षातर्फे सरचिटणीस हिरामण गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संघटन अभियानाचा शुभारंभ माजी नगरसेवक भिकन वराडे यांच्या हस्ते करण्यात आला. धुळे भाजपा महानगरतर्फे भाजपाच्या आझाद नगर मंडळ, देवपूर पूर्व मंडळ, देवपूर पश्चिम मंडळ, मिल परिसर मंडळ, पेठ विभाग मंडळ, जुने धुळे मंडळ, अग्रवाल नगर तसेच साक्री रोड मंडळ या आठ मंडळांत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी भाजपाच्या सर्व मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
राबविण्यात येणार्या योजनांची माहिती देणार
धुळे शहरात भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली संघटन अभियानाला शुभारंभ झाला आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात पक्षाचे विस्तारक, पालक, बुधप्रमुख, मंडल अध्यक्ष यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची माहिती सरचिटणीस हिरामण गवळी यांनी दिली आहे. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचा निश्चय केला असून त्यासाठी हे अभियान पंधरा दिवस राबविण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागात पक्षाचे विस्तारक, पालक, मंडल अध्यक्ष हे प्रत्येक घरी जावून सभासद नोंदणीचे काम करतील अशी माहिती माजी नगरसेवक भिकन वराडे यांनी दिली आहे. सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या योजनांची माहिती पोहचविणे लाभार्थ्यांना येणार्या अडचणी दूर करणे यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी भाजपाचे संजय बोरसे, भिमा शर्मा, नंदू ठोंबरे, शशी मोगलाईकर, अमर फरताडे, राहूल गांधी, प्रतिक मोरे, मगन पाटील, माजी नगरसेविका भारती माळी, मोनिका शिंपी, जगदीश माळी, दिनेश शिंदे, गौरव माळी, मयुर पाटील, अमित भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. तसेच देवपूर पच्छिम मंडळात माननीय पंडीत दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार आणि विस्तारक योजनेची सुरवात करण्यात आली.यावेळी विस्तारक आणि पालक तसेच मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.